राहाता शहरातील सिरत कमिटीच्या वतीने १५०० व्या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राहाता शहर व परिसरात सामाजिक आणि आरोग्य सेवा उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून सर्वधर्मीय एकात्मता आणि मानवसेवेचा संदेश दिला जात आहे.
साकुरी येथील सिद्ध संकल्प मंगलकार्यालय येथे डॉ. जकवान गौरी यांच्या नेतृत्वाखाली हिजामा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दोनशेहून अधिक तरुणांनी हिजामाचा लाभ घेत आरोग्य सुधारण्याचा मार्ग अवलंबला.
त्याच ठिकाणी डॉ. आमिर इनामदार आणि डॉ. वसीम कुरेशी यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक नागरिकांनी या सेवांचा लाभ घेत आपल्या आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळवले.
सिरत कमिटीच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी सुमारे ७० हजार रुपयांची केळी आणि बिस्किटे लहान मुलांना वाटप करण्यात आली. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हा कार्यक्रमाचा खरा यशाचा मानबिंदू ठरला.
सायंकाळी सिद्ध संकल्प मंगलकार्यालय येथे मौलाना अब्दुल्ला कासमी चतुर्वेदी (डायरेक्टर, एज्युकेशन अकॅडमी, बिहार) यांचे मार्गदर्शनपर प्रवचन आयोजित करण्यात आले. यावेळी राहाता आणि परिसरातील मुस्लिम तसेच हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना यहया, सिरत कमिटी अध्यक्ष शाहरुख बागवान, सामाजिक कार्यकर्ते हाजी मुन्नाभाई शाह, इलियास शहा, जेष्ठ पत्रकार मुस्ताक शहा, सलमान पठाण, शून्नाभाई शेख, भैय्या पैलवान, मतीन पठाण, तौसिफ सय्यद, इरफान शेख, दानिश पठाण, सद्दाम शेख, वाजिद शेख, साजिद इनामदार, खलील तांबोळी, जाहिद दारुवाले, शहाणवाज शेख, अर्शद शेख, नदीम शेख, शाहरुख तांबोळी, सोहेल शेख, जावेद सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमादरम्यान राहाता पोलीस स्टेशनच्या उपपोलीस निरीक्षक कोमल कुमावत, लायन्स क्लबचे डॉ. संजय उबाळे, साहिल उद्योगसमूहाचे मालक दिलीप रोहम, माजी नगराध्यक्ष कैलास (बाप्पू) सदाफळ, रियाजभाई शेख, धनंजय गाडेकर, भगवानराव टिळेकर, दिपक सोळंकी, बाळासाहेब गिधाड, बाबासाहेब काकड पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे, विलास मोरे, पोलीस नाईक विनोद गंभीरे, यांसह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला पाठिंबा दिला.
या उपक्रमामुळे समाजातील परस्पर सहकार्य, सेवा आणि सद्भावनेचा संदेश बळकट झाला. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी आणि मानवतेसाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.