राहाता : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ७ मध्ये सध्या एकच नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे — रियाज हुसेन शेख. कोणत्याही राजकीय पदावर नसतानाही रियाजभाईंनी गेल्या काही वर्षांत प्रभागातील नागरिकांच्या अडचणींवर तत्परतेने काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
स्थानिक पातळीवर लहानसहान समस्यांपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे असो वा गरजवंतांना मदतीचा हात देणे — रियाजभाईंनी नेहमीच “जनतेचा माणूस” म्हणून काम केले आहे.
त्यामुळेच या वेळी प्रभाग क्र. ७ मधील नागरिकांचा एकमुखी सूर असा आहे की, “यावेळी आमचा उमेदवार रियाजभाईच असावा!”
स्थानिकांमध्ये असे मत उमटत आहे की, जर रियाज हुसेन शेख यांना नगरसेवक पदाची संधी मिळाली, तर ते आणखी जिद्दीने व प्रभावीपणे जनतेसाठी काम करतील.
सध्या प्रभागात त्यांच्या नावाची चर्चा जोरात असून, लोकांमधील हा उत्साह पाहता रियाजभाईंची उमेदवारी निश्चितच निवडणुकीच्या रणधुमाळीत नवे समीकरण निर्माण करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!