राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ६ ऑक्टोबर रोजी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोडतीत राज्यातील २४७ नगरपरिषदां व १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राहाता नगराध्यक्ष पद ओ.बी.सी. सर्वसाधारण राखीव ठरले आहे.
दरम्यान, राहाता नगरपरिषद २०२५-२६ च्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज नगरपरिषद सभागृहात पार पडला. या वेळी शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी व राहाता नगरपरिषद प्रशासक माणिकराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या उपस्थितीत सोडत सकाळी ११ वाजता संपन्न झाली.
या सोडतीत १० प्रभागांमधील २० जागांसाठी (१० महिला व १० पुरुष) आरक्षण निश्चित करण्यात आले.
राहाता नगरपरिषदेतील एकूण मतदारसंख्या एकूण मतदार १९,४६४ पुरुष ९,७६६ महिला ९,६९८
प्रारूप मतदार यादी नुसार प्रभागनिहाय मतदारसंख्या व आरक्षण तपशील
प्रभाग क्र. (१) एकूण मतदार १,९८०. पुरुष १,०२७ महिला ९५३. (अ) महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग (राखीव) (ब ) सर्वसाधारण
प्रभाग क्र. (२) एकूण मतदार १,८१६ . पुरुष ९२८. महिला ८८८. (अ) महिला अनुसूचित जमाती (राखीव). (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र. (३) एकूण मतदार १,८४१ . पुरुष ९३९. महिला ९०२. (अ) महिला अनुसूचित जाती (राखीव) (ब ) सर्वसाधारण
प्रभाग क्र. (४) एकूण मतदार २,२०४ . पुरुष १,०७२. महिला १,१३२. (अ) महिला अनुसूचित जाती (राखीव) (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.(५) एकूण मतदार १,६९१. पुरुष ८२२. महिला ८६९. (अ) सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (राखीव) (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र.(६) एकूण मतदार २,०६८. पुरुष १,०३०. महिला १,०३८. (अ) सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग (राखीव) (ब) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र.(७ ) एकूण मतदार २,०८४. पुरुष १,०४८. महिला १,०३६ . (अ ) महिला सर्वसाधारण (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.(८) एकूण मतदार १,९८४ .पुरुष ९७५. महिला १,००९ . (अ )अनुसूचित जाती (राखीव) (ब ) सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र.(९) एकूण मतदार १,७२५ . पुरुष ८८८. महिला ८३६ . (अ ) महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग (राखीव) (ब) सर्वसाधारण
प्रभाग क्र.(१०) एकूण मतदार २,०७२. पुरुष १,०३७. महिला १,०३५ . (अ ) महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग (राखीव) (ब ) सर्वसाधारण
या सोडतीच्या वेळी शहरातील नागरिक, माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.