राहाता नगरपरिषदेच्या आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये शहरातील दहा प्रभागांमधून विजयी उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे नोंदवला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधून गिधाड पुजा विजय यांनी १ हजार ९ मते तर प्रविण (गोटू ) रंगनाथ सदाफळ १ हजार ६५ मते मिळवत विजय संपादन केला.
प्रभाग २ मधून माळी रविना सुरेश यांना ९०५ मते मिळाली तर आग्रे अरुण गोपाळा यांना ८६४ मते मिळाली.
प्रभाग ३ मधून सदाफळ राहुल मुकुंद यांनी १ हजार १४६ मते तर आरणे पुष्पा प्रभाकर १ हजार १०६ मते मिळवत यश मिळवले.
प्रभाग ४ मधून निकाळे अर्चना भीमराज यांनी ८३५ मते मिळवली तर सदाफळ विजय पुंडलिक यांना ७६२ मते मिळाली.
प्रभाग ५ मधून तुपे दशरथ अशोक यांनी ६३३ मते तर सदाफळ सविता बाळासाहेब ५१२ मते मिळवत विजय मिळवला.
प्रभाग ६ मधून मुर्तडक संदीप विष्णू यांना ९३४ मते मिळाली तर डांगे मंगल सुरेश यांना ८४१ मते मिळाली.
प्रभाग ७ मधून सदाफळ अंजली कैलास यांनी ९८६ मते तर शफिक (मुन्नाभाई) रफिक शहा ५०१ मते मिळवत मतदारांचा विश्वास संपादन केला.
प्रभाग ८ मधून शेळके अनिता सुयोग यांना ६८६ मते मिळाली तर पाळंदे ऋषिकेश (मयुर) सुनिल यांना ५७१ मते मिळाली.
प्रभाग ९ मधून बनकर शितल प्रदिप यांनी ९६९ मते तर लोळगे शशिकांत विश्वनाथ ६९० मते मिळवत विजय नोंदवला.
तर प्रभाग १० मधून गाडेकर नितीन नानासाहेब यांनी १ हजार ९९ मते तर गाडेकर निता अरुण १ हजार २९ मते मिळवत विजयी कौल मिळवला.
या निकालांमधून राहाता शहराच्या कारभारासाठी नवे लोकप्रतिनिधी निवडून आले असून, आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.