श्रीरामपूर /
येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील जुने अधिकारी बदलून गेल्यवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असल्याने मध्यंतरीच्या काळात बरीच कामे प्रलंबित असल्याने वाहन चालविण्याच्या लायसनपासून ते वाहन हस्तांतरित – नावावर (टी.ओ) करणे, वाहनावरील बोजा चढवणे, कमी करणे, वाहन पासिंग करणे आदि कामे खुपच मंद गतीने सुरु होती,याचा वाहन चालक, मालकांना खुपच त्रास जाणवत होता,परंतु आता सर्वच कामे पुर्वीप्रमाणे सुरु झालेली असून काही दिवसांतच सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे दिसून येते आहे.

वाहन व्यावसायातील बहुतांशी अशाही काही व्यक्ती आहेत की, ज्यांचे हातावर पोट आहे,त्यातील काही इकडून,तिकडून उसनवारीने पैशांची जोडजमव करत स्वतःची नवी – जुने वाहन खरेदी करण्याचे स्वप्न बघतात,परंतु आरटीओ कार्यालयातील वेळेत योग्य कागदपत्र मिळविण्याच्या विलंबापाई कित्येकांचे हे स्वप्न भंग देखील पावतात ही वास्तविकता आहे.
तर वाहन चालविण्याचे लायसनला देखील सहा सहा महिने अप्रूव्हल मिळत नसल्याने, नोकरी फॉर्म भरण्याची मुदत निघून गेल्यावर कित्येकांचे नोकरी मिळवाण्याचे स्वप्न देखील अक्षरशः धुळीस मिळत आहे.याची संबंधित आरटीओ कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे आवश्यक असताना, मात्र असे होताना दिसून येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. करीता प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर विनोद सगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर, अनंता जोशी आणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर संदिप निमसे यांनी स्वतः जातीने लक्ष घालुन समस्त वाहन चालक,मालक यांच्या आरटीओतील कामांविषयी समस्यांचे निराकरण करावा अशी त्रस्त वाहन चालक, मालकांकडून मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. Nagar Varta Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!