राहाता नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख, आणि प्रभाग ८ मध्येच सर्वाधिक तणाव. कारण आजच उलगडणार होतं जनतेवर कोण लादले जाणार आणि जनता कोणाला आपला ठरवणार!
उमेदवारांची नावे समोर आली आणि प्रभाग ८ मध्ये एकच चर्चेचा स्फोट झाला “आमचं ठरलेलं आहे, आम्हाला लादलेले उमेदवार मान्य नाहीत!”
ज्यांना महिनोमहिने आश्वासने देत फिरवले, त्यांनाच निर्णायक क्षणी बाजूला ढकलले गेले. आणि त्याजागी आयात उमेदवार, दबावाचे राजकारण आणि वरून आणलेली नावे नागरिकांवर थोपवण्याचा प्रयत्न झाला.
पण प्रभाग ८ ची जनता शांत बसणारी नव्हे. त्यांनी आपल्या स्वरात तिखटपणा आणत एकच घोषणा केली, “लादलेले उमेदवार आम्ही निर्यात करू. आणि आम्ही सो. ख. यांनाच विजयी करू!”
आणि त्यात सर्वात जास्त घुमत असलेला एकच मुद्दा “आम्हाला शे. पा. नकोत. आम्हाला हक्काचे सो. ख. हवेत!”
ज्यांनी वर्षानुवर्षे प्रभागाच्या समस्या उचलल्या, नागरिकांसाठी धावपळ केली, जे सुख – दुःखात सोबत उभे राहिले, त्या सो. ख. त्यांच्याबद्दल प्रभाग ८ मध्ये प्रचंड आत्मीयता तयार झाली.
राजकीय डावपेच, दबाव, बाहेरून लादलेली नावे हे काही प्रभाग ८ स्वीकारणार नाही. कारण येथे सत्ता कट्ट्यावर ठरत नाही. इथे निर्णय घेतो जनतेचा आवाज! आणि त्या आवाजात आज एकच घणाघात “शे. पा. नकोत, सो. ख. हवेत!”