नगर शहरातील कोटला स्टॅंड जवळील इंगळे मेडिकल शेजारी असलेल्या पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे हजरत पैगंबर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात रक्तातील थायरॉईड, तीन महिन्यांची रक्तातील साखर (HbA1c), चरबी (Lipid profile) आणि शुगर तपासणी नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अशपाक पटेल यांनी दिली.
सदरील शिबिर सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:०० या वेळेत होणार असून याचा लाभ घेण्यासाठी नगर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही पटेल स्पेशालिटी क्लिनिक च्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अशफाक पटेल (M.B.B.S., M.D. Medicine) करणार आहेत. डॉ. पटेल यांनी एम.बी.बी.एस. (के.ई.एम. मुंबई), एम.डी. मेडिसिन (एस.के.एन. पुणे) यासह युनायटेड किंगडम, नवी दिल्ली व न्यूयॉर्क येथून डायबेटीस, हृदयरोग, जेरियाट्रिक मेडिसिन आणि इतर विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांना गुंतागुंतीच्या हृदयविकार तसेच डायबेटीस व्यवस्थापनाचा दांडगा अनुभव आहे.
आरोग्य तपासण्या महागड्या असल्यामुळे अनेक रुग्णांना वेळेवर निदान होत नाही. अशा वेळी या मोफत तपासणी शिबिराचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. रक्तातील साखर, चरबी, थायरॉईड अशा तपासण्या हृदयरोग, मधुमेह व इतर गंभीर आजारांच्या निदानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.
