राहाता
विश्वनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे राहाता मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर आणि कार्यकर्त्यांनी राहाता ग्रामीण रुग्णालयात जाऊन आज जन्मलेल्या मुलींचे स्वागत केले.
या कार्यक्रमात जन्मलेल्या मुलींना नवीन कपडे, बेबी किट आणि इतर आवश्यक साहित्य देऊन स्त्री जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सेवा पंधरवाड्याची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली.
कार्यक्रमात बोलताना राहाता मंडलाध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रम राबवून त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. या कालावधीत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, युवक मॅरेथॉन, पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनी, दिव्यांग उपकरणांचे वाटप, खादी वस्तूंचा प्रचार, चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.”
माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत नुकत्याच जन्मलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली.
भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य नितीन कापसे म्हणाले की, “आज स्त्री जन्माचे स्वागत करून आम्ही पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहितासाठी विविध योजनांद्वारे सेवा कार्य राबवत आहोत.”
या कार्यक्रमास माजी नगरसेवक विजय शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप गाडेकर, संजय उबाळे, दीपक दंडवते, मिलिंद बनकर, मंडल उपाध्यक्ष संतोष सदाफळ, भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष चेतन रनमाळे, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष पुनीत बर्डे, सोशल मीडिया प्रमुख गणेश आरणे, सुनील लोंढे, कोषाध्यक्ष पंकज कुलकर्णी, मिलिंद बनकर, स्वप्नील गाडेकर, संदीप गाडेकर, सचिन केकान, चेतन गाडेकर, मकरंद कुलकर्णी, विशाल गायकवाड, किरण गायकवाड, रंगनाथ गिधाड, योगेश गायकवाड, संतोष गिधाड, विकास गिधाड, विजय गिधाड, गणेश म्हसे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
