त्यांना काय टिका करायची ते करु द्या, अस वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहीजे का? याचा समाज बांधवांनी विचार केला पाहीजे. तुम्ही व्यक्तिव्देशच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्तर नाही अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
कोणतही आंदोलन करताना मागण्यांची भूमिका मांडणे गरजेची असते, असे सांगून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती. मात्र काही नेत्यांकडून केवळ बागुलबूवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅझेट मधील नोंदी १९६७ साला पासून आहे. दाखला मिळण्यासाठी शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. मात्र काही व्यक्तिंनी प्रसिध्दीसाठी वक्तव्य करताना भान ठेवले नाही. सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या बाबतीतत्या याचिका न्यायप्रविष्ठ असताना न्यायालया बाहेर काही लोकं मुक्ताफळ उधळीत असतील तर त्याला आपण काय उत्तर देणार, अशा टिका झाल्यावर वेदना होतातच, आमचे देखील अनेकांशी तात्वीक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाहीत. तुम्ही व्यक्तिव्देशच करणार असाल तर, माझ्याकडे याचे उत्तर नाही त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता समाचार घेतला.
मराठवाड्यात उध्दव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर टिका करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, त्यांच्याकडे आता हंबरडा फोडण्याशिवाय काही राहीलेले नाही. शासनाने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतक-यांना नियम बदलून मर्यादा वाढवून दिली आहे. आता फक्त निवडणूका जवळ आल्यामुळेच त्यांचे हंबरडा फोडण्याचे काम सुरु झाले आहे. सरकारला काम करु द्याव असं आवाहन ना.विखे पाटील यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नामकरणा वरुन कोणी काही वक्तव्य करीत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. येथे येवून कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्ही निश्चित कारवाई करु. जिल्ह्याचे नाव का बदलले हे विचारण्याचा आधिकार आता त्यांना नाही अशी स्पष्ट भूमिका ना.विखे पाटील यांनी मांडली.