समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी नेहमीच लढा देणारे, पत्रकारितेत PhD करून डॉक्टरेट मिळवणारे उच्च शिक्षित आणि प्राध्यापक म्हणून समाजमनावर ठसा उमटवणारे डॉ. जयंत दामोदर गायकवाड आता जनतेच्या आग्रहास्तव नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध प्रखर आवाज उठवणारा हा चेहरा आता थेट लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे.
डॉ. जयंत गायकवाड हे गेली दोन दशके दिल्ली, मुंबई, हैद्राबाद आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये पत्रकारिता करत होते. समाजकारणातील संवेदनशील मुद्द्यांवर त्यांनी अनेक वेळा निर्भीडपणे प्रश्न उपस्थित केले, सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले. त्यांच्या गॉडफादर न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेचा आवाज बुलंद झाला असून या चॅनलला तब्बल ३० लाख विवर्स आहेत. लेखणी आणि धैर्य यांच्या जोरावर त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे ते केवळ पत्रकार नाहीत, तर “जनतेच्या आवाजाचे प्रतीक” म्हणून ओळखले जातात.
पोलीस स्टेशनपासून ते तहसील, पंचायत समिती, कलेक्टर कार्यालयापर्यंत सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सतत धावणारा हा लढवय्या आता नगरसेवकपदासाठी उमेदवारी करत आहे. त्यांच्या प्रखर वक्तृत्वशक्ती, लेखन कौशल्य आणि प्रशासनिक जाणिवेमुळे या निवडणुकीत नव्या विचारांचे वारे वाहतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
नगरपरिषदेत “जनतेसाठी, जनतेकडून, जनतेच्या हितासाठी” अशी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याची ताकद डॉ. जयंत गायकवाड यांच्यात आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पत्रकारितेतून समाजसेवेचा प्रवास आता राजकारणातून परिवर्तनाच्या दिशेने झेप घेणार असून, शहरातील ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेच्या आवाजाची परीक्षा ठरणार आहे.