राहाता नगरपरिषदेची हवा पुन्हा एकदा बदलतेय राजकीय समीकरणांचे काटेकोर गणित, तिकीटांची लगबग, गोटबाजीची कुजबुज, या सगळ्यांच्या पलीकडे एक नाव मात्र जनतेच्या मनात वर्षानुवर्षे दृढपणे रुजलेले आहे. ते नाव म्हणजे डॉ. स्वाधीन गाडेकर.
भाजपने अधिकृतपणे राहाता नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली, आणि उमेदवारांची यादी समोर आली; पण या यादीतील एक नाव बघताच नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाच स्मित हास्य उमटलं. कारण हा उमेदवार कागदावरचा नव्हे, तर जनतेच्या मनाचा उमेदवार आहे. लोकांचा नेता, सामान्यांचा सोबती, आणि आपल्याच घरातील माणूस, असा ओळखीचा, सहज उपलब्ध, बोलका आणि समाधान देणारे व्यक्तिमत्व.
गेल्या दशकभरात राहाता शहरातील प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक सामाजिक उपक्रमात डॉ. ‘स्वाधीन गाडेकर’ हे नाव कार्यातून, गरजूंना केलेल्या मदतीतून आणि कठोर मेहनतीतून उमटत आलं आहे. सत्तेत नसतानाही लोकांच्या प्रश्नांना आपला मुद्दा समजून लढणारा नेता आज विरळा. म्हणूनच या उमेदवारीची फक्त ‘राजकीय घोषणा’ नाही, तर जनतेच्या अंतःकरणात दडलेल्या भावनेचं अधिकृत रूप आहे.
राहात्याचा सामान्य नागरिक गाडेकरांना पाहतो ते एखाद्या खुर्चीवर बसलेल्या नेत्याच्या रूपात नव्हे तर आपल्यासारख्या एका आपल्या माणसाच्या रूपात. एखाद्या आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी धावणारा, सामाजिक प्रश्नांवर आवाज बुलंद करणारा, तरुणांना दिशा देणारा, आणि अत्याचारग्रस्तांसाठी खंबीरपणे उभा राहणारा.
आणि म्हणूनच आज जनता म्हणते “उमेदवारी भाजपने दिली पण आमच्या मनातील नगराध्यक्ष तर आधीपासूनच ठरलेला आहे!”
या निवडणुकीत पक्षांचे रंग बदलतील, घोषणांचा सुकाळ होईल, आश्वासनांचे पाऊस पडतील परंतु जनतेच्या मनातील श्रद्धा ही बदलत नाही. दशकभरापासून असलेले त्यांचे अधिराज्य केवळ लोकप्रियतेचे नाही; ते निष्ठेचे, विश्वासाचे आणि सेवाभावाचे अधिराज्य आहे.
आज राहाता नगरपरिषद एका निर्णायक वळणावर उभी आहे. शहराला केवळ ‘नेता’ नको आहे त्यांना पाहिजे आहे आपला माणूस. आणि तो माणूस कोण, याबाबत कोणताही संभ्रम जनतेच्या मनात नाही.
ही उमेदवारी म्हणजे फक्त राजकीय लढाई नाही ही आहे जनतेच्या मनातील नेता आणि राजकीय पटावरचा अधिकृत उमेदवार यांची एकत्रितता!
हेच सांगत नागरिकांच्या ओठावर एकच वाक्य तरंगू लागलंय “या वेळी नाही तर कधीच नाही राहाता नगराध्यक्ष म्हणून डॉ. स्वाधीन गाडेकरच!” हाच जनतेच्या मनाचा आवाज.