राहाता शहरात एक नाव उच्चारलं की प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर विश्वासाचा उजेड झळकतो. ते नाव म्हणजे शफिक रफिकभाई शाह, उर्फ मुन्नाभाई शाह, शहराच्या मनात कोरलेलं, आपल्या वागणुकीतून सर्वधर्मीय ऐक्याची शपथ घेऊन जगणारे.
मुन्नाभाई शाह यांनी समाजकार्य हे केवळ ‘काम’ म्हणून कधी केले नाही; ते त्यांच्या रक्तातच आहे. समाजातील वंचित, पीडित, दुबळ्या घटकांसाठी दिवसरात्र धावणारा हा माणूस कधी तरुणांना रोजगार देत, कधी कुटुंबांचे प्रश्न सोडवत, तर कधी भांडणात विभागलेल्या दोन समाजांना एकत्र आणत.
कोरोना काळात ‘नफा’ नव्हे, ‘माणुसकी’ विकली, आणि जन्म झाला “ऑक्सिजन मॅन”चा! कठीण काळ होता. श्वासच विकत घ्यावा लागत होता. लोक दवाखान्यांचे दरवाजे ठोठावत होते आणि घराघरात भीतीचे सावट होतं तेव्हा कोणतीही गणितं न मांडता, कोणताही नफा न कमावता, आलेल्या भावात ऑक्सिजन सिलेंडर लोकांना पुरवणारा एक माणूस धावत फिरत होता. शहरात शेकडो कुटुंबांचे प्राण वाचले, आणि एका क्षणात राहाता शहर त्यांना एका नव्या नावाने हाक मारू लागले “ऑक्सिजन मॅन मुन्नाभाई शाह!” हा सन्मान त्यांनी पदासाठी नव्हे, मनासाठी मिळवला.
सर्वधर्मीय एकतेचा जिवंत पूल! धर्म, जात, पंथ कुठल्याही चौकटीत न बसणारी माणुसकी मुन्नाभाई शाह यांच्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदू. वाद पेटला की ते शांतता प्रस्तापित करण्यासाठी पुढे धावत. गरज पडली की दोन्ही बाजूला बसवून समाधान काढत. सर्वधर्मीय समन्वयाची कडी म्हणजे मुन्नाभाई अशी शहरातली प्रतिमा.
विखे पाटील परिवाराशी तीन पिढ्यांचं नातं आणि आता राजकारणातील नवी जबाबदारी!
विखे पाटील परिवाराशी अढळ, तीन पिढ्यांचे नाते, निष्ठा आणि कामाचा वारसा घेऊन मुन्नाभाई शाह आज राजकारणात स्थिरपणे पाऊल टाकत आहेत. त्यांच्या निष्ठेचा आणि सेवेचा ठेवा ओळखूनच विखे पाटील परिवार व भाजपने प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी देत त्यांच्यावर भरवसा ठेवला आहे.
जनता म्हणते हा माणूस निवडूनच येणार! प्रभाग ७ मध्ये सध्या एकच चर्चा सुरु आहे “मुन्नाभाई शाह जिंकलेच पाहिजेत, कारण त्यांनी आधी सेवा केली, आता नेतृत्व करणार!” गल्लीत, चौकात, कट्ट्यावर, व्यापाऱ्यांत, महिलांमध्ये, तरुणांमध्ये एकाच सुरात आवाज उठतो: “हा आमचा माणूस! हा आमचा सेवक! आणि आता हा आमचा नेताच होणार!”
ही फक्त उमेदवारी नाही; हा सर्वधर्मीय एकतेचा आणि माणुसकीच्या धर्माचा विजय आहे! मुन्नाभाई शाह यांच्या उमेदवारीत समाजसेवा, मानवता, सर्वधर्मीय बंधुत्व आणि नेतृत्वाची परंपरा एकत्र नांदते. त्यांच्यात जनता पाहते सेवा केलेल्या माणसाला सत्ता दिली तर बदल आपल्या घरात येईल. म्हणूनच प्रभाग क्रमांक ७ मधील नागरिक ठामपणे सांगत आहे “मुन्नाभाई शाह निवडूनच येणार!”